युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : आजोबांकडून पारंपारिक वाद्याची कला अवगत केल्याने सनई च्या सुरावर संबळाच्या तालावर ताशा वादनाचे काम करायचे. घरची गरीबीची परीस्थिती असल्याने या वाद्यकलेवर वडीलांना प्रपंचात हातभार लावायचा. पण मनात काहितरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द होती. त्यातून गावातच अॅकडमी असल्याने मिळेल त्यावेळी सराव करायचा. इतर वेळी लग्न समारंभात वादक म्हणून श्रोत्यांची मने जिंकण्याचे काम करायचे. पण अखेर त्यांच्या चिकाटी, कष्ट आणि जिद्दीला यश आले. जांबूत ( ता. शिरूर ) येथील सुरज संतोष उदागे यांनी मुबंई लोहमार्ग पोलिस दलात भरती होऊन यश निश्चित केले. (Admirable! A young man who knows the art of music, joins the Mumbai railway police force; Suraj Udage from Jambut in Shirur taluka is being appreciated everywhere…!)
शिरूर तालुक्यातील जांबुत येथील सुरज उदागे यांचे होतेय सर्वत्र कौतुक…!
शिरूर तालुक्यात जांबूत हे लोकवस्ती बाजारपेठ असणारे गाव आहे. घोडनदीच्या पाणी व्यवस्थापनामुळे शेती व्यवसायातून विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी उपबाजार समिती आहे. त्या पाठोपाठ बिबट प्रवण क्षेत्र असल्याने दिवस व रात्रीच्या वेळी भितीचे वातावरण असते. बिबट्याच्या हल्ल्यात या भागात अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. (Shirur News) पोलिस भरतीसाठी महत्वाची म्हणजे शाररीक सराव महत्वाचा असतो. पहाटे सराव करण्यासाठी बिबट्याच्या वावर असल्यामुळे शक्य झाले नाही. तरीदेखील दिवसा उपबाजार समिती च्या जागेत सराव करण्याकडे त्याचा कल होता.
जय मल्हार हायस्कूल मध्ये सुरज चे प्रथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. आदर्श विद्यालयात त्याने बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. एकत्रीत कुटूंब असल्याने घरात आजोबा पासून सगळेच काही ना काहितरी पारंपारीक वाद्यकाम करणारे आहे. (Shirur News) आजोबा भागीनाथ उदागे (सुप्रसिद्ध संबळ वादक ), वडील संतोष उदागे संबळ वादक, चुलते – मंगेश उदागे बेंजो वादक, भाऊ -रुपेश उदागे ढोलकी वादक आणि गायक आहेत. त्यामुळे आजोबांच्या तालमीत सुरजने ताशा चे प्रशिक्षण घेऊन ताशा वादक झाला. सध्या सुरज ला हार्मोनियम, संबळ, माऊथ ऑर्गन, ढोलकी, कची, पॅड अशी वाद्य वाजवतो. . सध्या संपूर्ण घरातले सदस्य पारंपरिक वाद्य कला जपत आहेत.
सूरजला प्राथमिक शिक्षणापासूनच पोलिस दलात जाण्याची इच्छा होती. त्यामुळे २०१८ पासूनच त्याने अॅकडमी मध्ये प्रवेश मिळवला होता. मिळेल तसा सराव करून परीक्षा देण्याचे ठरविले. मध्यतंरी लोकडॅाऊनच्या काळात सगळे व्यवसाय बंद पडले होते. (Shirur News) त्यावेळी या कलाकारांवर उपासमारी ची वेळ आली होती. त्या काळातही कुटूंबाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उभारी देण्याचे काम सुरूज ने केले होते. आपल्या गावातील नागरिकांबरोबर कुटूंबातील व्यक्ती कोरोना पासून वाचावा यासाठी त्याने गावातील संस्थाबरोबर देखील काम केले होते.
अखेर २०२३ मध्ये कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस दलाची परिक्षा दिली. या परीक्षेत तो यशस्वी ठरला. त्यामुळे या भरतीत लोहमार्ग पोलिस ( मुंबई ) विभागात तो भरती झाला. (Shirur News) सध्या प्रशिक्षणासाठी तो सांगली कडे रवाना झाला आहे.
एकतरी असू दे अंगी कला ! नाहीतर कशाला फुकट जन्माला !…
मनापासून ज्या गोष्टीसाठी कष्ट अन चिद्द स्विकारली त्यामध्ये यश मिळाल्याने व कुटूंबाच्या आर्शिवादाने पोलिस भरती झाल्याने समाधानी आहे. (Shirur News)जिवनात संगित वाद्य कला ही कधी ही वाया जात नाही. ती कुढेही उपयोगी पडते. त्यामुळे कुटूंबासमवेत आई वडीलांचा भार कमी करण्यासाठी वादक म्हणून काम केले. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करावे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळेल.
सुरज उदागे
मुंबई लोहमार्ग पोलिस ( पोलिस प्रशिक्षणार्थी )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती ग्लोबल स्कूलचा दहावीचा निकाल जाहिर