युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : हवामान खात्याचा अंदाज यासाठी प्रत्यक्ष ढगांचे छायाचित्र उपग्रह देत असल्याने हवामान शास्त्रज्ञ त्यानूसार पावसाचा अंदाज वर्तवित आहेत. असे असले तरीही मराठी वर्षाच्या सुरूवातीला पारंपारिक पद्धतीने नक्षत्रांच्या आधारावर पावसाचा अंदाज बांधण्याची पद्धत आजही रूढ आहे. यातून पुरोहितांनी वर्तविल्या प्रमाणे नक्षत्र व सुर्याचे वाहन यातून पावसाची स्थिती समजून घेतली जात आहे. त्यावर शेतीच्या पेरणीचे अंदाज शेतकरी वर्ग करताना दिसतो. (Abundant rain in Mrig Nakshatra; Panchagkarta’s opinion, elephant vehicle from today)
या वर्षी देखील मृग नक्षत्रात हत्तीचे वाहन असल्याने पाऊस भरपूर येणार असा अंदाज लावला जात आहे. गुरूवार पासून मृग नक्षत्र सुरू होत असल्याची माहिती पुरोहित गणेश जोशी यांनी सांगितले.
भारतीय खगोल शास्त्रानूसरा २७ नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्र आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित आहेत. यांना नक्षत्रे असे म्हणतात. अश्विनी, भरणे, कृतीका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्व, पुष्प, आश्लेषा, मघा, पूर्वा, तरा, हस्त, चित्रा, स्वाती, (Shirur News) विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मुळापुर्वी, उत्तरा, श्रवण, गणेशा, शततारका, पूर्वा,रेवती या नावाने नक्षत्रांची ओळखआहे. यातील मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्र ही पर्जन्य नक्षत्रे आहे. जीवनदायी नक्षत्र म्हणून त्याची ओळख आहे. नक्षत्रे किंवा राशी यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकृतीवरून ठेवली गेली आहे. पावसाची नक्षत्रे आणि वाहन कालदर्शिकेवर जून ते आक्टोबर या काळात काहि तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश व त्यांच्या वाहनांची नावे आढळतात. या वर्षी सूर्याच्या मृग नक्षत्राला आठ जून पासून सुरूवात होत असताना हत्ती हे वाहन दर्शविले आहे. पावसाची सहसा नऊ नक्षत्र मानली जातात. मॅान्सूनपूर्व पावसाचे रोहिणी हे नक्षत्र धरले जाते.
सुरूवातीला चांगला पाऊस होईल असा अंदाज
या वर्षी मृगात हत्तीचे वाहन आहे. हत्ती, बेडूक, व म्हैस या वाहनांना भरपूर तर उंदीर, गाढव,मेंढा यांना कमी पाऊस अपेक्षीत आहे. मोर, कोल्हा व घोडा असल्यास मध्यम पाऊस पडेल. असे मानले जाते. यंदा मृगाचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे सुरूवातीला चांगला पाऊस होईल. असा अंदाज शेतकरी वर्गाकडून लावला जात आहे.
अखेर हवामान खात्याचा अंदाज व पंचाग कर्त्याचे पावसाविषयी अंदाज अनेकवेळा चुकिचे ठरले आहेत. कधी ही होणार्या पावसाला अवेळी होणारा (Shirur News) पाऊस म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. असे असले तरीही यावर्षी वेळेत पाऊस व मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जमिनीच्या वाटपावरून अल्पवयीन मुलाने थेट जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने केले वार