Shirur News : शिरूर, (पुणे) : घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका ६५ वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. १९) म्हसे (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. त्यांना तत्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
बिबट्याचा मुक्त संचार वाढला
तुळसाबाई या लघुशंकेसाठी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराम घराबाहेर आलेल्या तुळसाबाईवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. (Shirur News ) या हल्यात त्यांच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. बेट भागातील जांबूत, पिंपरखेड या भागांत बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, मागील दोन वर्षांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. पशुधनासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून, (Shirur News ) बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.