Shirur News : सणसवाडी : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वढू बुद्रुक चौकात आज पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ट्रॅव्हलचालक सोहन रतनसिंह राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलगीरी ट्रॅव्हल्समधील चालक सोहन रतनसिंह राठोड (वय ४१, रा. रूपीनगर, निगडी, पुणे, मूळ रा. उज्जैन, ता. पाटी, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) निलगिरी ट्रॅव्हल्स ही बस (क्र. एम. एच. १२ एच. बी. २८५९) चालवत होते. (Shirur News) ही बस नगरकडून पुण्याकडे जात असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील वढू चौकामध्ये वढू बुद्रुक गावाच्या बाजूने महामार्गावर मोटारसायकल (क्र. एम. एच. २८ बी. पी. २२८९) चालक प्रतिक सुनिल भुजाडे (वय २३, सध्या रा. अवनी निलय सोसायटी, कोरेगाव भिमा, ता. शिरूर) हा भरधाव वेगात महामार्ग ओलांडताना ट्रॅव्हल्सच्या दरवाजाखालील बाजूस असलेल्या टायरला धडकला.
हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचालक ट्रॅव्हल्सला बाजूला धडकून महामार्गावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. (Shirur News) यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची फिर्याद सोहन राठोड या ट्रॅव्हल्सचालकाने दिली आहे. (Shirur News) या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात ; दुष्काळ जाहिर करण्याची शेतकऱ्यांची मागणी