शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत, (पुणे) : दारू पिऊन वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा आहे. मागील सहा महिन्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १७५ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, यापुढे हि कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी वाहन चालकांना दिला आहे.
ओतूर पोलिसांचा वाहन चालकांना इशारा..
जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा दंड करून बेशिस्त वाहन चालक सुधारत नसल्याने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेशिस्त वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, स्टंट करणे, नागमोडी वळणे घेत वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे असे प्रकार घडल्यावर कारवाई तर होणारच आहे. त्यासाठी वाहन चालकांनी शिस्तीचे व नियमाचे पालन करावे. (Shirur News) अन्यथा कारवाई अटळ असल्याचेही कांडगे यांनी सांगितले.
दरम्यान, ओतूर परिसरातील दुचाकी, कारचालक, मालवाहतुक वाहने पिकअप, ट्रॅकचालक यांनी देखील कॉलेज, शाळा व गर्दीच्या ठिकाणी वाहने हळू चालवावीत. दुचाकी, फोर व्हीलर बेशिस्त पार्किंग करू नये. अशा वाहन चालकांवर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. (Shirur News) नागरिकांनी मॉर्निंग वॉकला हायवे वर जाऊ नये. स्वतःची काळजी घ्यावी. असे आवाहन ओतूर पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कवठे येमाई येथील पिरसाहेब गणेश मित्र मंडळाने स्वच्छतेचा संदेश देत बाप्पाला दिला निरोप