युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतले होते. नीट परिक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकिय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी माझ्या वडीलांनी वैद्यकिय महाविद्यालयाचे उंबरटे पालथे घातले. मुलीला डॅाक्टर करायचे. हा त्यांच्या डोळ्यातील भाव मला सारखा सतावत होता. रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या बापाचे स्वप्न पुर्ण करायचे. एवढाच काय तो उद्देश होता.
शेतीतून उत्पन्न नाही पण मुली, तू स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा त्यांचा सल्ला होता. आज मी डॅाक्टर झाले… पुढील स्त्री रोग तज्ञ म्हणून शिक्षण घेऊ लागले. आज आयुष्यात खंबीरपणे उभे राहिल्यानंतर माझे वडील किती ग्रेट आहेत. याची प्रचिती पदोपदी येते.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील ज्योती बाळासाहेब खटाटे हिने बीएचएमएस वैद्यकिय शिक्षण पुर्ण करून पुना हॉस्पिटल ला स्त्री रोग तज्ञ म्हणून प्रशिक्षण घेत आहे. फादर्स डे निमित्त तिने आपल्या वडीलांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केले.
बापाची जिद्द: मुलगा, मुलगी झाले डॅाक्टर
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे बाळासाहेब शंकर खटाटे यांनी अवघे नववी पर्यंत चे शिक्षण पुर्ण केले आहे. चार एकर शेती पण दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे बाजारभाव नसल्याने शेतीत गुंतवलेले भांडवल देखील वसूल होत नाही. अशी परिस्थिती होती. एक मुलगा आणि एक मुलगी, पत्नी असा लहान परिवार असल्याने कुटूंबाचा घर खर्च कसा भागवायाचा असा प्रश्न होता.
ज्योतीने स्वतःच्या पायावर उभे रहावे हा त्यांचा ध्यास होता. (Shirur News) तिला वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात ते कधी कमी पडले नाही. त्यातून पत्नी मंदा शेतात नाहितर वेळप्रसंगी मोलमजूरी करत असे. या दरम्यान बाळासाहेबांनी रूग्णवाहिकेवर चालक म्हणून काम केले. वेळप्रसंगी मिळेल तसा अभ्यास करून ज्योतीने बारावी विज्ञान व निट परीक्षा उत्तीर्ण झाली.
त्यानंतर अथक परीश्रमातून संगमनेर येथील इथापे होमीयोपॅथीक वैदकिय महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चीत झाला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तीने बीएचएमएस चे वैद्यकिय शिक्षण पुर्ण केले. यासाठी माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील व माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, माजी सरपंच दामूआण्णा घोडे यांचे प्रोत्साहन मिळाले.
या शिक्षणात तिला अनेक वेळा पैशाची अडचण भासली पण तीने कधीही वडीलांपर्यंत ही चणचण दिसू दिली नाही. शिक्षण पुर्ण झाल्यावर पुणे येथील पुना हॉस्पिटल ला स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रशिक्षण घेत आहे.
घरची परीस्थिती बेताची असली तरी वडील म्हणून बाळासाहेबांनी मुलीला नेहमीच प्रोत्साहन दिले. अखेर तिला तिच्या पायावर उभे केले. त्यानंतर मुलगा शुभम हा देखील बारावी उत्तीर्ण झाला. (Shirur News) मुलीच्या शिक्षणाचा खर्च असताना देखील वडीलांचे कर्तव्य त्यांनी पार पाडले.
त्यातून शुभमला देखील बीएएमएस ला इंगतपूरी येथील एसएनबीटी विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तो देखील डॅाक्टर होणार असल्याने कष्टकरी बापाची छाती स्वाभिमानाने फुलून आली आहे. कष्टकरी खांद्याला मुलगी अन मुलगा असा संसाराच्या चाकांना डॅाक्टर म्हणून बळ येणार आहे.अखेर स्वाभिमानी बापाची ही धडपडणारी दोन मुले समाजात नावलौकीक मिळवणारी ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी आयुष्य बळकट करायचे असेल तर जिद्द व चिकाटीने यशाकडे वाटचाल केली पाहिजे. (Shirur News) आई वडील हे मुलांनी योग्य शिक्षण घ्यावे यासाठी धडपडत असतात. त्यांच्या कष्टाला बळ निर्माण करावयाचे असेल तर योग्य शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे.
– दिलिप वळसे पाटिल, माजी गृहमंत्री
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : घोडनदीवरील ढापे चोरून नेणा-यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांनी घेतले ताब्यात
Shirur News : पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले