पुणे : राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरीत अखेर दिसत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर त्यांना 9000 मतांची आघाडी आहे तर महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.