Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur : शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी घावटे, तर उपसभापतीपदी सासवडे बिनविरोध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 March 2026, 16:42
Shirur

photo- ppn

रांजणगाव गणपती / प्रतिनिधी पोपट पाचंगे

Shirur : जिल्ह्यात सर्वांचे लक्ष असलेल्या शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी स्वाती विठ्ठल घावटे यांची, तर उपसभापतीपदी रामराव बबनराव सासवडे यांची बिनविरोध निवड झाली.

मागील महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पाच सदस्य, तर एक अपक्ष सदस्य विजयी झाला होता. मात्र अपक्ष सदस्य कोमल ढेरंगे यांनी गटनोंदणीत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा दिल्याने पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सदस्य झाले. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

 

आज सोमवारी (दि. ९) सभापती व उपसभापती निवडीवेळी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार ॲड. अशोक पवार, पक्ष निरीक्षक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ सदस्यांची शिरूर खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात बैठक झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सभापती व उपसभापती पदांसाठी बंद पाकिटात पाठविलेली नावे पक्ष निरीक्षक बुट्टे पाटील यांनी जाहीर केली. त्यामध्ये घावटे यांचे सभापतीपदासाठी, तर सासवडे यांचे उपसभापतीपदासाठी नाव होते. यावेळी सर्व नऊ सदस्यांना विभागून संधी देण्यात येणार असल्याचे आमदार कटके व माजी आमदार पवार यांनी जाहीर केले.

पंचायत समिती सभागृहात पदाधिकारी निवडीवेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घावटे, तर भारतीय जनता पार्टीकडून गटनेत्या मनिषा पाचंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासवडे, तर भाजपकडून सागर देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यानंतर अर्ज माघारीच्या वेळेत भाजपच्या पाचंगे व देवकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी घावटे व उपसभापतीपदी सासवडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व गटविकास अधिकारी महेश डोके यांनी जाहीर केले.

या निवडीनंतर नूतन सभापती घावटे व उपसभापती सासवडे यांचा माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष रविंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दीपक पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, माजी सदस्य राहुल पाचर्णे, रेखा बांदल, चंद्रशेखर पाचुंदकर, राजेंद्र नरवडे, माजी सभापती विश्वास कोहकडे, दादासाहेब कोळपे, प्रकाश पवार, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जासूद, अरुण घावटे, विठ्ठल घावटे, सतीश पाचंगे आदी उपस्थित होते.

या बिनविरोध निवडी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना समर्पित करण्यात येत असून, सर्व सदस्यांना बरोबर घेऊन कामकाज करण्यावर भर देणार असल्याचे सभापती घावटे व उपसभापती सासवडे यांनी निवडीनंतर सांगितले.

दरम्यान, या निवडीमुळे पंचायत समितीला तब्बल पावणे तीन वर्षांनंतर नवे पदाधिकारी मिळाले आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Saswad News : बोपगावमध्ये ‘हॉर्न’ वाजवल्यावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने फोडले डोके ; सासवड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 16:09

सक्षमच्या मित्रांनी दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या तर त्याच्या भावाकडून गैरवर्तन; सासर सोडल्यानंतर आंचलने केले गंभीर आरोप

Monday, 15 June 2026, 16:09

पुणेकरांनो आजपासून शहरात ‘दिवसाआड’ पाणीपुरवठा; महापालिकेचा पाणी बचतीचा निर्णय

Monday, 15 June 2026, 16:01

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात

Monday, 15 June 2026, 15:56

साहित्यिकांची पंढरी पुण्यात! शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा; ‘या’ तारखेला होणार सुरवात…

Monday, 15 June 2026, 15:27

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59
Next Post

उन्हाने जीव व्याकुळलाय? 'ही' 5 नैसर्गिक पेये देतील शरीराला थंडावा; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.