युनूस तांबोळी (शिरूर, Shirur)
हर ख्वाहिश हो मंजूर-ए-खुदा !
मिले हर कदम पर रज़ा-ए-खुदा !
फ़ना हो लब्ज़-ए-ग़म यही है दुआ !
बरसती रहे सदा रहमत-ए-खुदा !,
ज़िन्दगी का हर पल, खुशियों से कम ना हो, आपका हर दिन
ईद के दिन से कम ना हो,
ऐसा रमझान ईद का दिन, आप को हमेशा नसीब हो,
जिसमे कोई दुःख, कोई गम पास ना हो…
ईद -उल – फित्र म्हणजेच रमजान ईद
ईद -उल – फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण केले. रमजान ईद च्या पवित्र सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन मानवजातीत शांतता व सलोखा राखण्या प्रार्थना यावेळी करण्यात आली. हिंदू बांधवांनी ईदगाह मैदानावर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या सणानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.
शुक्रवार ( ता. २१ ) अलविदा जुम्मा ची नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शेवटचा रोजा ( उपवास ) इप्तार पार्टी झाली.त्यावेळी चंद्रदर्शन ७ वाजून१०मिनीटाने झाले. तेव्हापासून ईद चा चॅांद मुबारक म्हणून शुभेच्छा देण्यास सुरूवात झाली. शनीवार ( ता. २२ ) रमजान ईद असल्याचे यावेळी घोषीत करण्यात आले. सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले. या निमित्ताने मसजीद वर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिरूर तालुक्यात गावोगावी व शिरूर शहरात वेगवेगळ्या ईदगाह मैदानावर शुक्रवार ( ता.२२ ) सकाळी आठपासून ईदगाह मैदानावर गर्दी झालेली पहावयास मिळाली.
माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या
माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघातील मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा पाठविल्या असल्याचे आंबेगाव – शिरूर विधानसभा राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.
मौलानांनी या वेळी मुस्लिम धर्मीयांना धर्माबाबत व मानवजातीविषयी मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले . अखंड मानवजात शांतता व सलोख्यात राहण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर ईद उल फित्र ची नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर खुदबा पठण झाले. शेवटी सामुहिक प्रार्थना ( दुवा ) करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी यावेळी गळाभेट घेऊन सणानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलिस कर्मचारी विशाल पालवे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार युनूस तांबोळी, दैनिक सकाळचे पत्रकार अनवर मोमिन, लोकमतचे पत्रकार शरीफ मोमीन, नवराष्ट्र चे पत्रकार शरीश तांबोळी, अकबर पिंजारी, रशीद मोमीन, रफिक आत्तार, मौलाना अब्दुल रज्जाक, नुरखान पठाण आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य अरूणा घोडे, माजी सरपंच दामुआण्णा घोडे, माजी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी संपुर्ण तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सगळीकडे शांततेत सण साजरा करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘अक्षय तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा…!