शिरूर: शिरूर (जि.पुणे) येथील बाफना (Shirur Crime) मळा जवळून जाणाऱ्या पुणे-अ.नगर बाह्य (Pune News) वळणाजवळ आज (ता.8) दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे.

खून झालेल्या तरुणाचे वय 20 ते 21 वर्षाच्या दरम्यान असून,त्याचे नाव संतोष मारुती ढोबळे (रा.वाडा कॉलनी, शिरूर,जि.पुणे)असे आहे. अशी माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.

तरुणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला. याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शिरूर पोलिसांनी तीन संशयितांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात







