Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘आता बस! त्याचा गेम करायचा’ बॉयफ्रेंडच्या सततच्या छळ आणि मारहाणीला कंटाळून प्रेयसीने भावाच्या मदतीने केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 22:35
Pune Crime: 'Stop it now! Play his game' Tired of boyfriend's constant harassment and beating, girlfriend commits horrific act with brother's help

Photo-Social Media

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने केवळ 48 तासांच्या (Pune Crime) आत प्रियकराच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणत सर्व (Chakan News) आरोपींना अटक केली आहे. चाकण जवळील कडाचीवाडी येथील ठाकरवस्ती परिसरात 2 ऑक्टोबर रोजी मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची गती वाढवत आरोपींना गाठले. मृत व्यक्तीचे नाव मुकेश कुमार (वय 24) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार आणि आरती कुमारी बिजलाउराम उराव (वय 23) यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र राहात होते. मात्र, या संबंधांत वारंवार वाद व्हायचे. मुकेश हा आरतीवर किरकोळ कारणावरून हात उचलत असे. सततच्या या मारहाणीला कंटाळून आरतीच्या मनात राग आणि सूडाची भावना निर्माण झाली. शेवटी तिने आपल्या भावाला आणि आणखी एका साथीदाराला मदतीसाठी बोलावले.

2 ऑक्टोबर रोजी या तिघांनी मिळून मुकेशवर प्राणघातक हल्ला केला. आरती आणि तिच्या साथीदारांनी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर व तोंडावर वार केले. वारंवार झालेल्या हल्ल्यामुळे मुकेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि तो चाकणजवळील निर्जन ठिकाणी फेकून दिला.

मृतदेह सापडताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने स्वतंत्र तपास पथक तयार केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. त्याचबरोबर, मुकेशसोबत राहत असलेल्या काही व्यक्ती अचानक खोली सोडून गायब झाल्या असल्याचे समोर आले. या धाग्यांवरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी संभाजीनगर येथे लपून बसले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश बिजलाउराम उराव (वय 21), आरती कुमारी बिजलाउराम उराव (वय 23) आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय 21) अशी आहेत.

या तिन्ही आरोपींवर चाकण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने ही कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, योगेश आढारी, राम मेरगळ, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, समीर काळे आणि शेखर खराडे यांनी तपास पूर्ण करून आरोपींना अटक केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
Vardha Crime: Two people fell in love with the same girl; an argument turned into a fight and a terrible incident took place in anger...

एकाच तरुणीवर जडलं दोघांचं प्रेम; वादाचं रूपांतर हाणामारीत अन् रागाच्या भरात घडलं भयंकर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp