Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाच तरुणीवर जडलं दोघांचं प्रेम; वादाचं रूपांतर हाणामारीत अन् रागाच्या भरात घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 22:44
Vardha Crime: Two people fell in love with the same girl; an argument turned into a fight and a terrible incident took place in anger...

Photo-Social Media

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील (Vardha Crime) आर्वी शहर हादरवून सोडणारी (Vardha News) घटना गुरुवारी दुपारी गांधी चौकात घडली. प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या वादाचा शेवट एका 30 वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव सलीम सबदर शा (रा. संजय नगर, आर्वी) असं असून, पोलिसांनी या खुनाच्या घटनेनंतर अल्पावधीतच आरोपी निखिल बुरे (रा. हरदोली) याला अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सलीम शा आणि निखिल बुरे या दोघांमध्ये एका तरुणीवरून वाद सुरू होता. दोघांनाही तीच मुलगी आवडत होती. या कारणावरून त्यांच्यात राग, चिडचिड आणि सततचं भांडण सुरू होतं. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा या वादाला सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. शेवटी या वैराचं रूप जीवघेण्या संघर्षात बदललं.

गुरुवारी दुपारच्या सुमारास गांधी चौकात अचानक सलीम आणि निखिल यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. सुरुवातीला दोघांमध्ये बोलाचाली झाली. वाद अधिक चिघळताच निखिलने अचानक आपल्या जवळील धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि सलीमवर वार केले. वार इतके जबरदस्त होते की, सलीम गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी सलीमला रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या आतच आरोपी निखिल बुरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

घटनेनंतर गांधी चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. सलीमचा मृतदेह पाहून नागरिकांत संताप उसळला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

या घटनेमुळे आर्वी शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे स्थानिक नागरिक हादरले आहेत. प्रेमसंबंधासारख्या वैयक्तिक कारणावरून युवकांमध्ये इतका मोठा संघर्ष होऊन त्याचा शेवट खुनात झाल्याने समाजमनातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई होण्याचं स्वप्न अधुरं! गरोदर पत्नी घेत होती कापूरची वाफ, पती अचानक जवळ आला अन्… हिंजवडीत घडलं भयंकर

Saturday, 24 October 2026, 13:15

गराडे येथे कोयता बाळगून फिरणारे तिघे पोलिसांच्या रडारवर; नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 13:01

जेजुरीजवळील पांडेश्वरमध्ये सर्पदंशाने दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; घराशेजारी खेळताना काळाचा घाला

Saturday, 24 October 2026, 12:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट! त्यानेच हल्ला घडवून आणल्याची आरोपीने विशेष शाखेला कथित कबुली दिल्याची पोलीस दलात चर्चा; आर्थिक उलाढालीची राज्यभर चर्चा

Saturday, 24 October 2026, 12:39

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43
Next Post
Maharashtra Politics: Municipal elections will be postponed directly to April, indications of a stalemate over the 45-day 'that' issue

Maharashtra Politics: तर महापालिका निवडणुका थेट एप्रिलपर्यंत ढकलल्या जातील, 45 दिवसांच्या 'त्या' मुद्द्यावरुन रखडपट्टीचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp