युनूस तांबोळी
Shirur | शिरूर : अस्मानी संकट व शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीचे अश्रु पहावयास मिळतात. काबाडकष्ट करणाऱ्यांच्या जीवनात नेहमीच समस्या असतात. काही झाल तरी पोलिस दलात जायच. यासाठी मुलगा अन सुनेने घेतलेला ध्यास. त्यातून कुटूंबाने दिलेले प्रोत्साहन दिले.
कांदा काढणी करत असताना अखेरची मिरीट लिस्ट लागली अन मुलगा अन सून पोलिस दलात भरती झाल्याची माहिती मिळाली.त्यावेळी या शेतकरी कुटूंबात आनंदाचे अश्रू पहावयास मिळाले. या मुलाने आपल्या पत्नीला उचलून घेऊन कांद्याच्या शेतात आनंद उत्सव साजरा केला.
चांहोड( ता. शिरूर ) येथे शेतकरी म्हतारबा शेलार यांचा मुलगा तुषार अन सुनबाई भाग्यश्री पोलिस भरती झाले आहेत. चांडोह येथील म्हतारबा शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या विकासासाठी झटणारे कुंटूंब आहे. आई कुसूम शेलार ही पाच वर्ष सरपंच म्हणून त्यांनी अनेक विविध विकास कामात मोलाचे सहकार्य केले आहे. रस्त्यापलीकडे असणाऱ्या गावाला वेगळीओळख निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केले. या गावात आजही एसटी ची सुवीधा नाही.
दोघांना पोलिस भरतीचे वेध…
तुषार च लग्न भाग्यश्री बरोबर सन २०२० मध्य़े पार पडल. फक्त पोलिस दलात भरती होयचे असा विचार तुषार आणि भाग्यश्री ने ठरविला होता. त्यांना दोघांना पोलिस भरतीचे वेध लागले होते. त्यामुळे लग्न झाले तरी वैवाहिक जीवन कोणत्याही परीस्थीतीत करायचे नाही. त्यासाठी तुषार ने गेली चार वर्षे खुप कष्ट घेतले आहे. दररोज असणारा व्यायाम शिवाय घर व शेतात असणारे काम याला फाटा देऊन या जोडप्याने फक्त पोलिस भरतीचे लक्ष ठेवले होते.
दरम्यान, वेळप्रसंगी घरातील अडचणी यामुळे त्यांना खुप त्रास झाला आहे. त्यावर मात करून त्यांनी पोलिस दलात यशस्विता मिळवता आली. जांबूत येथील पोलिस अॅकडमीतून या परीसरात तरूण या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. असे असले तरी या जोडप्याच्या कष्टाला यशाचे फळ लागले आहे. त्यामुळे निकाल लागल्यावर पतीने या पत्निला खांद्यावर उचलून घेऊन आनंद व्यक्त केला.
सासरी नांदायला आल्यावर सासूने मुलीप्रमाणे अन जाऊने बहिणी प्रमाणे वागणूक दिली. सासरे अन भावाने खुप सहकार्य केले. दररोज चा व्यायाम व अभ्यास या परीक्षेसाठी कामी आला. जिद्द अन चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाले आहे. आई अन वडीलांच्या आर्शीवादाने र्पोलिस दलात भरती झाले.
भाग्यश्री शेलार
आई, वडील व भाऊ, वहीनीच्या आर्शिवादाने हे यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात चार वेळा या भरतीसाठी पळालो. अखेर या वर्षी हे यश मिळवता आले. यासाठी पत्नी भाग्यश्री ने मोलाची साथ दिली. त्यामुळेच आम्ही दोघेही पोलिस भरती झालो. भविष्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढेल. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. पोलिस दलातील भरतीमुळे खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवन सुरू झाले.
तुषार शेलार
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : शिरूर तालुक्यात आनंदाचा शिदा वाटण्यास प्रारंभ
Pune | जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक उत्पादन