संतोष पवार
पळसदेव: पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी १५ जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ पुणे शाखेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा हिशोब, फंडाच्या पावत्या, भविष्य निर्वाह निधी परतावा प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, फरक बिले, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती, पदवीधर शिक्षक पदोन्नती आदि प्रश्नांवर सकात्मक चर्चा होऊन सदरचे सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिले.
सदरच्या सहविचार सभेस प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी संजय काळे, सुनिल गच्चे, विस्तार अधिकारी उगले, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राजाध्यक्ष गौतम कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, खेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिनगारे, कार्याध्यक्ष विशाल शिंदे, मावळ तालुकाध्यक्ष दशरथ गावडे, दौंड तालुकाध्यक्ष गोविंद जाधव, राजेंद्र फणसे, इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे, वेल्हा तालुकाध्यक्ष शुक्राचार्य कांबळे, बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे, इंदापूर प्रमुख सल्लागार तात्यासाहेब मसलखांब, इंदापूर उपाध्यक्ष नितीन मिसाळ, महिला प्रतिनिधी इंदापूर तालुका अध्यक्षा मनिषा ननावरे, महासचिव ज्योती भोसले, जिल्हा परिषद लिपिक वर्ग आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.