तळेगाव ढमढेरे
Shikrapur News : शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ॲबॅकस व जिनिअस कोचिंग क्लासेसच्या दहा विद्यार्थ्यांनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत सहभाग घेत, देश पातळीवर यश मिळवले. ॲबॅकस व जिनिअस कोचिंग क्लासेसच्या संचालिका अंजली शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ॲबॅकस व जिनिअस कोचिंग क्लासेसच्या १७ विद्यार्थ्यांनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत सहभाग घेतला होता. (Shikrapur News) या स्पर्धेमध्ये तृप्ती चौधरी, शिवम जाधव, अन्वय गुंजवटे, विहान गायकवाड, वैदेही लीधडे, निर्मयी गोसावी, राजवीर शिंदे, शुभम कोहले, अक्षरा राऊत, सत्यजित घाडगे या विद्यार्थ्यांनी देशात तिसरा ते सहावा क्रमांक मिळवला.
राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल दहा विद्यार्थी यश मिळवत असल्याची बाब कौतुकास्पद
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ॲबॅकस व जिनिअस कोचिंग क्लासेसच्या संचालिका अंजली शिंदे व हनुमंत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व नितीन अतकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (Shikrapur News) राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल दहा विद्यार्थी यश मिळवत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur News : शिक्रापुरातील महिला देव दर्शनाला गेली अन् चोरट्यांनी घरावर मारला डल्ला..