Shikrapur | पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या मोक्का प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश एस. बी. साळुंके यांनी हे आदेश दिले आहेत.
दिलीप नंदलाल होले उर्फ एन. डी. असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ साली रोजी रेडीयंट कॅश मॅनेजमेंट कंपनी चे कर्मचारी मोहसीन शेख रोजची वसुली करण्याकरिता शिक्रापूर येथील रिलायंस पेट्रोल पंपावर १५ लाख रुपये एवढी रक्कम घेऊन जाताना दोन अनोळखी इसमांनी शेख यांना थांबवून त्यांच्या हातातील पैश्यांची पिशवी ओढून आरोपी होल याने शेख यांच्या छातीत चाकू बोकासून पैसे घेऊन पळून गेले होते.
आरोपींच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर सदर गुन्ह्यात तपासादरम्यान आरोपींना अटक करून मोक्का कायद्याचे कलम लावण्यात आले होते. आरोपी येरवडा कारागृहात बंदिस्त असताना आरोपी होले यांनी अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत कोर्टात जामिनाचा अर्ज दाखल केला होता.
आरोपी याने कोणताहि गुन्हा केलेला नसून आरोपी यास खोट्या गुण्यात गोवण्यात आले असून पोलिसांनी घेतलेल्या ओळख परेड मध्ये दोष आढळून आलेले आहेत. तसेच आरोपीच्या विरुद्ध या पूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याने आरोपीला जामिनावर सोडण्यात यावे असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला होता.
दरम्यान, सरकारी पक्षाचे व आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश एस. बी. साळुंके यांनी आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. भालेराव यांनी दिली. सदर प्रकरणात अॅड. मयूर चौधरी यांनी मदत केली.