आंबेगाव (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना जोरदार धक्का दिला आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. शेखर पाचुंदकर आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
शेखर पाचुंदकर यांनी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्यासह शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. पाचुंदकर हे आता खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहेत. शेखर पाचुंदकर यांना आंबेगाव विधानसभेची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे.