पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील दोन पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सध्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार गर यांची बदली झाली असून त्यांची झोन-4 चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.