पुणे : एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे, आंदोलने, जाळपोळीच्या घटना सुरु आहेत. दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले असून आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांचं एकमत आहे. मात्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शाळेचा दाखला युफान व्हायरल केला जात आहे.(maratha Reasrvation )
व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर शरद पवार समर्थक विकास पासलकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले संबंधित जातीचा दाखला खोटा आहे, तसेच शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं नसल्याचंही पासलकर यांनी सांगितलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Sharad Pawar)
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू असताना दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. यावर सर्वच राजकीय पक्षांचं एकमत आहे. मात्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना ट्रोल केलं जात आहे. काही लोकांच्या मते शरद पवार हे ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे, तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवारच आहेत. त्यातच पवारांचा शाळेचा दाखला व्हायरल केला आहे. त्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.
तो दाखला फेक : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा व्हायरल झालेला शाळेचा दाखला फेक असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. हे कुणीतरी जाणूनबुजून करत असल्याचा दावाही सुळेंनी त केला आहे. तसेच पवारांचा ओबीसी उल्लेख असलेला दाखला जाणूनबुजून संघ आणि भाजप व्हायरल करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने शरद पवारांचा मराठा असा उल्लेख असलेला दाखला आणला आहे. (Supriya Sule)
संबंधित जातीचा दाखला खोटा; काय म्हणाले पासलकर?
शरद पवार यांचं शिक्षण बारामतीमध्ये झालं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवते. हा षडयंत्राचा भाग आहे. कित्येक वर्षापासून हे सुरू आहे. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावं लागतं. त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिलंय ते तुम्हीच पाहा. हा घ्या पुरावा. पवार मराठा असल्याचा हा धडधडती पुरावा आहे. असा आरोप विकास पासलकर यांनी केला आहे.(Vikas Pasalkar)