Sharad Pawar News : पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार जालना आणि सराटी या गावांचा दौरा करणार असून, जखमींची विचारपूस करणार आहेत. अंबड रुग्णालयात या आंदोलनातले जखमी उपचार घेत आहेत. शरद पवार त्यांचीही भेट घेणार आहेत. “जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल,” अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
घेतला मोठा निर्णय…
पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर मराठा आंदोलकांचे मत आहे की, पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर पोलिसांचे मत आहे की आधी दगडफेक सुरु झाली, त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. (Sharad Pawar News) या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. छत्रपती संभाजीनगर याठिकाणी बसची जाळपोळही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शरद पवार छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. साडेबाराच्या सुमारास अंबड रुग्णालयाला भेट देतील. तसंच शरद पवार हे वादीगोदरी रुग्णालयातही जाऊन जखमींची विचारपूस करतील. (Sharad Pawar News) त्यानंतर शरद पवार हे आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जालन्यातील लाठीमारानंतर पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ
Pune News: शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
Pune News : पतीचा पगार घेण्यासाठी कंपनीत गेलेल्या महिलेचा बॉसकडून विनयभंग; गुन्हा दाखल