बारामतीत : लोकसभा निवडणूकित चांगल यश मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आता आगामी विधानसभेच्या तयारीला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत विधान केलं आहे.
आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं. तर आता राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही, तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं आहे.
दुष्काळी दौरा
शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. यावेळी ते बारामती तालुक्यातील खांडज गावाट होते. शेतकरी मेळाव्यासाठी ते हजर होते. या गावातून अनेकांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. सत्ता येते. सत्ता जाते सुध्दा… पण आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोकं आठवण ठेवतात, असं शरद पवार यांनी म्हटलं.
तसेच सुप्रिया सुळेंना तुम्ही विजयी केलं. महाराष्ट्रात कुठे ही गेलो तरी चर्चा असायची की बारामतीत काय होणार आहे. लोकांना चिंता वाटायची जेव्हा मतपेटी उघडली तेव्हा कळालं. मी तुम्हाला एवढी खात्री देतो. तुम्हा लोकांच्या मतदारसंघाच नाव हे त्या ठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असे शरद पवार म्हटले.
आता आमची जबाबदारी आहे.
मी नेहमी सांगतो, देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणाला माहिती नाही ? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसले नाही. मतमोजणी जेव्हा झाली. तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात पण नाही घालता येतं. हे पाणी कसं नीट करता येईल, असंही शरद पवार म्हणाले.