पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानाला अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अनेक प्रमुख नेत्यांच्या एकाच दिवशी चार ते पाच सभा पाहायला मिळत आहे.
अशातच आता शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या सभांचे वेळापत्रक समोर आले आहे. मात्र, या वेळापत्रकात शिरूर विधानसभा मतदार संघाचे नाव नाही. त्यामुळे शिरूरमध्ये शरद पवारांची सभा होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तगडा प्लॅन तयार केला आहे. शरद पवार पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. शरद पवार हे 6 नोव्हेंबरपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत एकूण 50 सभा घेणार आहेत. यामध्ये उत्तर कराड, तासगाव कवठे महांकाळ, इंदापूर, कर्जत-जामखेड अशा महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या वेळापत्रकात शिरूर मतदारसंघाचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
- 9 नोव्हेंबर – दगीर, परळी, आष्टी, बीड
- 10 नोव्हेंबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
- 11 नोव्हेंबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
- 12 नोव्हेंबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
- 13 नोव्हेंबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
- 14 नोव्हेंबर- चिंचवड/पिंपरी रॅली
- 15 नोव्हेंबर – तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
- 16 नोव्हेंबर – वाई, कोरेगाव, माण, फलटण
- 17 नोव्हेंबर – करमाळा, माढा, कर्जत-जामखेड
- 18 नोव्हेंबर – भोर, दौंड, इंदापूर, बारामती