पुणे : दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. याबाबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उपस्थित नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल या ठिकाणी डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार आणि फडणवीस हे एकाच गाडीतून आले.
दरम्यान या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू उपस्थित राहणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
सध्या राज्यात विविध विषयांवर वाद निर्माण झाले असताना, पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.