पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक बलात्कार करुन त्याला धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश भालेराव असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 24) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत मुलाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा हा घरात झोपला होता. त्यावेळी आरोपी सुरेश भालेराव हा घरी आला. त्याने मुलाची पँट काढून त्याच्याबरोबर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकाराला मुलाने विरोध केल्याने तुला रोहित वाईन्सला घेऊन जातो, मग आपण जेवायला जावू असं सांगून कोणास काही सांगू नको, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करीत आहेत.