पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ वर्षाच्या मुलीची १९ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यातून मुलगी गरोदर झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते मे २०२३ या दरम्यान हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत १५ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१०) फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहन राजेंद्र गायकवाड (वय-१९ रा. भेकराई नगर, हडपसर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची ओळख जून २०२३ मध्ये झाली. पीडित मुलगी आणि आरोपीची ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. रोहन आणि पीडित मुलगी एका गार्डन मध्ये व मुलगी राहत असलेल्या परिसरात एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर आरोपीने हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये मुलीला घेऊन गेला.
त्याठिकाणी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी रोहनने वेळोवेळी मुलीसोबत संबंध ठेवले. त्यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.