पुणे : Pune Crime – शस्त्राच्या धाकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) ही घटना सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत घडली. (Pune Crime)
या प्रकरणी 20 वर्षीय तरुणाला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी व आरोपी तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी मुलीला दमदाटी करून स्वतःच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला धारदार हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.