पुणे : कोंढवा परिसरात नात्यातील एका तरुणाने मुलींचे आई-वडील घरात नसल्याची संधी साधून एका ११ वर्षीय आणि ९ वर्षीय अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन करुन लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित मुलींच्या ३५ वर्षीय आईने मुंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. ४) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मुबारक बंदेनवाज खोडती (वय-२०, रा. जमकंडी, कर्नाटक) याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या पतीच्या मामाचा मुलगा आहे. फिर्यादी व त्यांचे पती बाहेर गेल्यानंतर त्यांच्या ११ आणि ९ वर्षीय अल्पवयीन मुली घरात होत्या. त्यावेळी आरोपी फिर्यादीच्या मोठ्या मुलीला बेडरुमध्ये घेऊन गेला. तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने त्याला तसे करण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला.
या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.