पुणे : पुण्यातील ओपो मोबाईल कंपनीच्या ब्रांच ऑफिसचा फायनान्स मॅनेजर हा कार्यालयातील अनेक महिलांचा मानसिक, शारीरिक छळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजर ओमेश लुधानी असं आरोपीचं नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
मात्र नोकरीची गरज आणि बदनामीच्या भितीने महिलांनी तक्रार दिली नाही. तसेच तक्रार देणाऱ्या महिलांना संबंधिताने कामावरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेनंतर काही महिलांनी धाडस करून थेट महिला आयोगात या प्रकारची तक्रार दिली आहे.
राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील कामगार विभागाला संबंधित कंपनी आणि फायनान्स मॅनेजरवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ओप्पो या मोबाईल कंपनीचे पुण्यातील ब्रांच ऑफिस असलेल्या पीएम इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड (“इनलीड इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड”) कंपनीतील फायनान्स मॅनेजर ओमेश लुधानी हा कार्यालयातील अनेक महिलांचा मानसिक, शारीरिक छळ करत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली आहे.
नोकरीची गरज, बदनामीची भीती याने अनेक महिला पुढे येऊन तक्रार करत नाहीत, अशा परिस्थितीत ज्या महिलांनी धाडस दाखवत तक्रार केली. न्याय मागितला त्या महिलांनाच कंपनीने कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलांचा छळ करणाऱ्या ओमेश लुधानीसह त्याला वाचवणारे एच.आर. विभागातील अधिकारी यांचेवर ही कडक कारवाई झाली पाहिजे. लुधानीचे निलंबन करत निष्पक्ष चौकशी होण्यासाठी कामगार विभागाने याची दखल घेत कंपनीवर तातडीने कारवाई करावी. अशा सूचना दिल्या आहेत.
ओप्पो या मोबाईल कंपनीचे पुण्यातील ब्रांच ऑफिस असलेल्या पीएम इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड (“इनलीड इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड”) कंपनीतील फायनान्स मॅनेजर ओमेश लुधानी हा कार्यालयातील अनेक महिलांचा मानसिक, शारीरिक छळ करत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली आहे. नोकरीची…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 13, 2024