Sexual Harassment at Ruby Hall Clinic, पुणे : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? काही दिवसांपूर्वीची लैंगिक आणि मानसिक छळाला कंटाळून ४० वर्षीय मिताली आचार्य यांनी आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच महिला लैंगिक अत्याचाराचे अजून एक प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये भर दिवाळीत मोठी खळबळ उडाली आहे. एचआर डिपार्टमेंटच्या मॅनेजरने आणि टेक्निशियनने एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली आहे. तेवढंच नाही तर, ती मागणी मान्य केली नाही तर कामावरून काढून टाकलं जाईल, अशी धमकी दिली आहे. (Ruby Hall Clinic)
४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुबी हॉल हॉस्पिटलचा टेक्निशियन बाळकृष्ण शिंदे (रा. बिबवेवाडी) आणि एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Sexual Harassment)
पोलिसानी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित महिला ही दापोडी परिसरात राहण्यास आहे. ती रुबी हॉस्पिटलच्या युरो डिपार्टमेंट मध्ये काम करत होती. त्यावेळी शिंदे याने त्या ठिकाणी जाऊन तिच्याकडे पाहून अश्लील हातवारे करत तिला डोळा मारला. एवढंच नाही तर ‘माझ्याशी शरीर संबंध ठेव. नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेल. असं म्हणत तिचा विनयभंग केला. यासंदर्भात वैतागलेल्या पीडित महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केला. (Rape case)
या प्रकरणाची चौकशी एचआर विभागाकडून सुरू होती. मात्र, मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव याने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून तिला तू खोटे बोलत आहेस. तुझ्या डाव्या हातावर आणि अंगावर किती डाग आहेत, हे मला सगळं माहिती आहे. असं बोलून त्याने देखील तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत. हा सर्व प्रकार २१ एप्रिल २०२३ आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घडला आहे. (Koregaon Park Police)