Pune News : पुणे : पुणे स्टेशन (Pune station) परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (five-star hotel) सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश पोलीसांनी केला असून चार तरुणींची ( four young women) सुटका केली आहे. तर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालांना (brokers) पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) ही कारवाई केली आहे. (Pune Crime News)
परराज्यातील चार तरुणींची सुटका
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलीसांनी ताब्यात घेतल व चार तरुणींची सुटका केली. ह्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील स्टेशन जवळील काही अंतरावर एक पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. बाहेरील राज्यातील तरुणींना या हॉटेलमध्ये रुम बुक करत हे दलाल त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घ्यायचे. हा सर्व व्यवहार ऑनलाइन चालत होता.
पोलीसांनी याबाबत माहिती मिळाली असता पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. व त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणांना बोलवण्यात आले. आणि त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला.
दरम्यान वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने यातील दलालाशी संपर्क साधला. आणि त्यानंतर हॉटेल परिसरातच सापळा रचला. आरोपींनी आधीच या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी या तरुणांना बोलवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन तरुणी यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन तरुणी आणि तीन दलालांना येरवडा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Pune Crime : खेड शिवापूर येथे कचरा साफ करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
Pune Crime : खेड शिवापूर येथे कचरा साफ करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू