उरुळी कांचन, (पुणे) : येथील सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूलच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत अडथळा शर्यत (हर्डल्स), स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर भालाफेक स्पर्धेत सहभागी विजेत्या खेळाडूंची या विभागीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या राजलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे विभागातील हवेली तालुका व पुणे जिल्ह्यातील १४ / १७ वयोगटातील मुलांच्या १००, २००, ४००, ६०० मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स) स्पर्धेत १७ वयोगटातील मुली अंजूला कुमारी, दिशा चोरघे, मुलांमध्ये जय परदेशी, अर्जुनसिंग नेगी, तर १४ वर्ष वयोगटातील खेळांमध्ये मुली श्रावणी म्हस्के, जिया शेख, तर मुलांमध्ये कार्तिक कुंजीर, तेजस चौधरी, यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भालाफेक स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील आदित्यराज म्हस्के याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर किक बॉक्सिंग स्पर्धेत १४ वर्ष वायोगटातील ७७ किलो वजनी गटात समृद्धी विचारे हिने प्रथम क्रमांक मिळवला तर १७ वर्ष वयोगटात विनीत कुंभारने ६४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर ५५ किलो वजनी गटात निरंकार विचारे याने कास्य पदक पटकावून यशस्वी झाले आहेत. विजेत्या स्पर्धकांची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती हि प्राचार्या राजलक्ष्मी यांनी दिली.
दरम्यान, इंग्लिश मेडियम स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकीकात भर पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्या राजलक्ष्मी यांनी अभिनंदन केले तसेच क्रीडाशिक्षक गुणवंत रोकडे, राजेंद्र चंद, आशिष क्षीरसागर यांनी स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच सर्व खेळाडू व शारीरिक शिक्षण विभागाचे कौतुक केले.