-सागर जगदाळे
भिगवण : कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका प्रियंका चव्हाण एस. वाय. बी.ए. हिची “राज्यस्तरीय गणतंत्र दिवस परेड कँम्प” साठी झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबीर पूर्व निवड चाचणी करीता जिल्हास्तरीय निवडचाचणी शिबीरामधून विद्यापीठ स्तरावर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण ता. इंदापूर येथील प्रियंका संतोष चव्हाण आणि स्वप्निल कांतीलाल लोंढे या दोघांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) 2025 , राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली परेड पूर्व जिल्हा स्तर निवड चाचणी शिबीर, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे येथे (दि. 11/09/2024) अनुक्रमे –
1) कु.प्रियंका संतोष चव्हाण-SYBA
2) स्वप्निल कांतीलाल लोंढे – T.Y.B.Sc.
3) वैभव जयंत भोईटे – T.Y.B.Sc.
हे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले होते.
यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे “पुणे ग्रामीण विभागाचे” विभागीय समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
प्रियंका संतोष चव्हाण हिच्या गणतंत्र दिवस परेड निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.