लोणी काळभोर, (पुणे) : येथील लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब जयवंत काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन चव्हाण यांनी कामकाज पहिले.
शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर यांच्या हस्ते बाळासाहेब काळभोर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रताप बोरकर, संस्थेचे अध्यक्ष संजय भालेराव, उपाध्यक्ष रत्नाताई काळभोर व संचालक मंडळ उपस्थित होते.