-राजेंद्रकुमार शेळके.
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री विघ्नहर विद्यालय, ओझर येधील 11 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या कॅरम स्पर्धेकरिता निवड झाली असल्याचे मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा पातळीवरील कॅरम स्पर्धा विद्या विकास मंदिर, राजुरी या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये ओझरचे 4 विद्यार्थी व 7 विद्यार्थिनी यांची विभागीय पातळी करिता निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक गणेश राऊत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व विश्वस्त, ग्रामपंचायत ओझर नंबर 1 व 2 सरपंच, सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून विभागीय पातळीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.