ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरुर येथील बाजल लिमिटेड कंपनीत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीचा मोबाईल चोरून त्यातील फोन पे द्वारे तब्बल ४५ हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सुरक्षारक्षक अंकुश इंगळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाब मोहम्मद आदाब हुसेन (वय-२८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. बमैहला, ता. लेहरपूर, जि. सितापूर, उत्तरप्रदेश) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील बाजल लिमिटेड कंपनीत कामाला असलेला सुरक्षा रक्षक इंगळे याने मोहम्मद हुसेन याचा मोबाईल चोरून नेला. त्यांनतर दोन दिवसांनी हुसेन याच्या फोन पे मधून वेळोवेळी पंचेचाळीस हजार रुपये ट्रान्सफर केले. याबाबत मोहम्मद आदाब हुसेन यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुरक्षारक्षक अंकुश इंगळे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस रासकर करत आहे.