पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (दि. १५) गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आशिष रावत (वय ४९, सध्या रा. पड्याळ वस्ती, औंध रस्ता, खडकी) हे संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात मुलीच्या आजीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर मुलगी बुधवारी (दि. १४) सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत चालली होती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची वाट ती पाहत थांबली होती. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक रावतने या मुलीला घरात नेऊन अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आजीला दिली. त्यानंतर रावतविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.