-बापू मुळीक
सासवड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी पुरंदर, यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांचा / त्यांच्या प्रास्ताविकांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्रांची छाननी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उपस्थित उमेदवार प्रतिनिधी यांचे स्वागत केले. नामनिर्देशन पत्रामध्ये सादर केलेल्या माहितीची तपासणी करून सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या 28 पैकी 26 उमेदवारांची 33 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून 7 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत.
वैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे (दि. 04 नोव्हेंबर) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे. त्यानंतर चिन्हाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.