पुणे : पुणेकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेनं जुनं पार्किंग धोरण मोडीत काढत नवीन धोरण आणून पुणेकरांवर आणखी नवा भुर्दंड लावण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेचे पार्किंग धोरण अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असतानाच अचानक हे धोरणच ‘कालबाह्य’ असल्याचा साक्षात्कार महापालिकेला झाला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने 2018 मध्ये मंजूर केलेल्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. पार्किंग शुल्कावरून नाराजीत वाढ होईल, या भीतीने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकांच्या काळात अंमलबजावणी टाळली होती.
पार्किंग धोरण कुठे लागू होणार?
- जंगली महाराज रस्ता
- नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज),
- नॉर्थ मेन रस्ता (गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सात),
- औंध डीपी रस्ता; तसेच या रस्त्यांशी संलग्न रस्ते,
- बालेवाडी हायस्ट्रीट
- विमाननगर
या सहा रस्त्यांवर पार्किंग शुल्काची आकारणी होणार असून आयुक्तांनी 15 जुलैला याबाबत राज्य सरकारकडे परवानगी मागणारं पत्र पाठवलं आहे.
‘हे’ असणार दर..
- जुन्या पार्किंग पॉलिसी – दोन प्रकार ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट
- ऑफ स्ट्रीट रस्त्यासाठी दुचाकी-प्रति तास 7 रूपये ते 14 रूपये प्रतितास, चारचाकी- प्रति तास 35 रूपये ते 50 रूपये असे दर होते .
- ऑनस्ट्रीट पार्किंग साठी दुचाकीला 20 रूपये ते 30 रूपये प्रतितास, तर चारचाकीला प्रतितास 50 रूपये ते 70 रूपये इतका दर होता.
- नव्या सुधारणेत वाढीव दराचा उल्लेख मात्र दर निश्चितीची नोंद करण्यात आलेला नाही.