पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. किरकोळ वादातून शाळकरी मुलावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आदील शेख (नय २०), अज्जू उर्फ अजहर इलीयास शरीफ (वय २३, रा. चाँदतारा चौक, नाना पेठ) यांच्यासह दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका शाळकरी मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शाळकरी मुलगा आणि त्याचा मित्र भवानी पेठेतील एका शाळेत शिकायला आहेत. दोघांची वर्गातील एका मुलाशी भांडणे झाली होती. शाळकरी मुलगा आणि त्याचे साथीदार आदील, अजहर शाळेच्या परिसरात आले. त्यांनी शाळकरी मुलगा आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर शाळकरी मुलाच्या मित्रावर कोयत्याने वार केले.
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देवकर करत आहेत.