पुणे : नांदेड सिटी (Nanded City) परिसरातून एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेतील अधिकारी तिला शोधण्यासाठी रस्त्यावर उतरले. बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी सायंकाळी रांजणगाव (Ranjangaon) येथील श्री महागणपती मंदिरात सापडलीआहे. ती मुलगी सुखरूप असून, तिला आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही मुलगी घरातून निघून गेल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला. यानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकांना मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. रात्री आठ वाजता तिला वाघोलीत असल्याचे एका तरुणाने कळविले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. मुलगी गुरुवारी संध्याकाळी सापडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार रांजणगावला गेले. रांजणगाव येथून व्हिडीओ कॉलवर ती सुखरूप असल्याची खात्री पोलीस आयुक्त व तिच्या आईने केल्यानंतर आयुक्त परतले. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेतील अधिकारी यावेळी उपस्थित होते.