शिक्रापूर : शिरूर तालूक्यातील शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या एका तरुणीने पालक रागावल्याने टोकाचे पाऊल उचललं आहे. तरुणीने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रिया दादाभाऊ वाघ (वय १६, रा. मलठण फाटा), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कानिफनाथ मंदिराशेजारी राहणाऱ्या आणि दहावीचे शिक्षण घेणाऱ्या प्रिया वाघ हिला तिचे चुलते आण्णा वाघ यांनी काही कारणामुळे रागावत नीट शाळा शिक, असे म्हटले होते. त्यांनतर (दि. ११) सकाळी बेडरूममध्ये गेले असता त्यांना प्रिया हिने गळफास घेतल्याचे आढळून आले.
दरम्यान, तिला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, याबाबत दादाभाऊ वाघ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.