लोणी काळभोर, ता. 4 : ज्ञानाची मशाल प्रत्येक घराघरात धगधगावी स्त्री शक्तीची महती साऱ्या जगाने गौरवावी! ज्योतीबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांच्या मदतीने आधुनिक शिक्षणाची बीजे स्त्रियांमध्ये पेरली गेली आहेत. त्या काळात फुले दाम्पत्यांना टीका, बहिष्कार आणि शारीरिक हल्लेसुद्धा सहन करावे लागले आहेत. पण सावित्रीबाई आपल्या ध्येय धोरणावर ठाम राहिल्या. त्यांनी आपले सुख, आनंद वस्तू अथवा दागिन्यांमध्ये न शोधता सामाजिक कार्यात शोधले आहे. असे प्रतिपादन व्याख्यात्या सुरेखा काळभोर यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुरुवारी (ता.३) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन सुरेखा काळभोर (गव्हाणे) यांनी केले आहे. यावेळी याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महसूल संघटना अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचरणे, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट,विश्वरत्न फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विश्वरत्न फौंडेशन या शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना 250 दप्तरचे (सॅक) वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना सुरेखा काळभोर म्हणाल्या की, “स्त्री चा सन्मान म्हणजे सावित्री, स्त्री ची व्यापकता म्हणजे सावित्री, स्त्री चा मुक्त विहार म्हणजे सावित्री आणी स्त्री ची उच्चता म्हणजे सावित्री” होय. ज्योतीबा व सावित्रीबाई फुले या दांपत्याने अनेक अडथळ्यांवर मात करून 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर एक क्रांतिकारक होत्या. ज्यांनी शिक्षणाचा उपयोग महिला आणि उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी साधन म्हणून केला. त्यांचे उपक्रम शिक्षणाच्या पलीकडेचे होते. त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि समान हक्कांचा पुरस्कार करताना बालविवाह आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथा दूर करण्यासाठी काम केले.
दरम्यान, प्लेगच्या साथीच्या काळात सावित्रीबाईंनी निःस्वार्थपणे आजारी लोकांची सेवा केली आणि दवाखाने उभारले, या प्रक्रियेत त्यांनी त्यांच्या आरोग्याचाही त्याग केला. त्यांचे जीवन धैर्य, करुणा आणि सामाजिक न्यायासाठी अखंड वचनबद्धतेचा दाखला होता. जयंती साजरी करत असताना, आपण त्यांच्यासाठी उभ्या राहिलेल्या मूल्यांवर चिंतन करूया आणि त्यांचे समानता आणि सशक्तीकरणाचे ध्येय पुढे चालू ठेवण्याची शपथ घेऊ या. आजही विविध प्रकारच्या भेदभावांशी लढा देत असलेल्या जगात, त्यांचे जीवन आपल्याला शिक्षण आणि दृढनिश्चयाच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करुन देत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रवासातून प्रेरणा घेऊन आणि सर्वांसाठी शिक्षण, न्याय आणि सर्वसमावेशकता टिकवून ठेवणाऱ्या समाजासाठी कार्य करून त्यांचा सन्मान करूया. असे सुरेखा काळभोर यांनी यावेळी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, माजी सरपंच वंदना काळभोर, प्राचार्य सिताराम गवळी, मुख्याध्यापिका सुनिता बोरकर, पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, पोलीस पाटील प्रियांका भिसे, भरत सारडा, कालिदास काळभोर, राजेंद्र ढवळे, लक्ष्मण चव्हाण, दिनकर सोनवणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते