पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.
यंदा १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या वेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावर्षीचा पदवी प्रदान सोहळा खास ठरणार आहे.