बिबवेवाडी,(पुणे) : पुणे-सातारा रस्त्यावरील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर सीएनजी भरलेली रिक्षाने अचानक पेट घेतला. या घटनेत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे.
गणेश बडदे (वय-52, रा. काकडे वस्ती) असं रिक्षा चालकाचे नाव आहे. बडदे हे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून झाल्यानंतर रिक्षा सुरु करताना रिक्षाच्या इंजिनने अचानक पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात येत नव्हती, कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला या घटनेबाबत त्वरित माहिती दिली. जनता फायर स्टेशनचा बंब घटनास्थळी दाखल झाले.
फायरमन निलेश माने, महेश वळवी, प्रशांत कुंभार, निरंजन घोरपडे, मदतनीस सागर इंगळे, अजित लांडगे, ऋषिकेश बिबवे यांच्या पथकाने आग अटोक्यात आणली तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती.