जीवन सोनावणे
Satara News : खंडाळा, (सातारा) : अहिरे ग्रामपंचायत हद्दीत एका २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
विजय बाळकृष्ण धायगुडे (वय – २६, रा. अहिरे, ता. खंडाळा) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव असून याबबत कलीम मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.
दुर्दैवी मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, खंडाळा तालुक्यातील आहिरे गावच्या हद्दीत काझीपट्टा शिवारामधील शेतात अज्ञात व्यातीचा मुतदेह मिळून आला होता. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदरचा मृतदेह हा विजय धायगुडे या तरुणाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
युवकाचा मृतदेह अहिरे गावच्या हद्दीतील शिवारात अमुद्दीन मानकर यांच्या शेतात आढळून आला. हा मृतदेह कुजला असल्याने ओळख पटविणयास पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करावे लागले.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सदर घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशन मध्ये झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबुराव वरे करत आहेत.