सासवड : सासवड नगरीत वीर फाटा व शहरातील विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. सोपान काकांची पालखी शहरात वीर फाटा, जेजुरी नाका, जयप्रकाश चौक, हुडेकरी चौक, जय मल्हार चौका मार्गे मंदिरात पोहोचली. ट्रस्टचे पालखी सोहळा प्रमुख वकील त्रिगुण गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे यावेळी उपस्थित होते.
सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, संजय चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका जगताप, पत्रकार बंधूंनी पालखीचे स्वागत केले. संत सोपानदेव समाधी मंदिरात दिंडी प्रमुख, चोपदार, विणेकरी, तुळशी वृंदावन धारक, महिला, नगारा रथ, बैलजोडीचे मालक, टाळकरी, मृदंगाचार्य, अश्व मालक आदींचा ट्रस्टच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.