Saswad News | सासवड, (पुणे) : जल जीवन योजनेअंतर्गत कोडीत खुर्द ( Saswad )येथील योजनेचे भूमिपूजन सरपंच प्रसाद खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
योजना एक कोटी सहा लक्ष रुपयाची…
ही योजना एक कोटी सहा लक्ष रुपयाची असून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये एक लाख लिटर पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था, विहिरीचे काम, सोलर या गोष्टींचा समावेश आहे. ऐन उन्हाळ्यात या योजनेमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये कस्तुराताई खैरे उपसरपंच, हेमलता जाधव ग्रामपंचायत सदस्य, विशाल कांबळे ग्रामपंचायत सदस्य, छायाताई खैरे ग्रामपंचायत सदस्य, बेबी विठ्ठल खैरे ग्रामपंचायत सदस्य, योगेश तळेकर ग्रामपंचायत सदस्य, मोहन बाबुराव खैरे तंटामुक्ती अध्यक्ष, प्रदीप खैरे माजी सरपंच, ग्रामसेवक महेश कुमार म्हेत्रे, कर्मचारी प्रभाकर खैरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोपान खैरे पाटील, सीआरपी नीता तळेकर, तसेच रोहन खैरे पुणे पोलीस,सूर्यकांत खैरे, दादा खैरे, काशिनाथ औचरे, चंद्रकांत खैरे नाना, सतीश नाना खैरे, हेमंत खैरे, मस्कू तळेकर, सुरेश तळेकर, दगडू नाना खैरे, विठ्ठल भाऊ खैरे, अनिकेत खैरे असेच इतर ग्रामस्थ ही उपस्थित होते.
अनेक वर्षापासून कोडीत येथे पाण्याचा मोठा प्रश्न होता या योजनेमुळे पाण्याचा प्रश्न सुटणार असे मनोगत सरपंच प्रसाद खैरे यांनी व्यक्त केले आभार विशाल कांबळे यांनी मानले .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune News | पुण्यातील बाल कल्याण समितीला बालविवाह रोखण्यास यश