Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतराज महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना; भरपूर पाऊस पडू दे अन् शेतकरी दुष्काळमुक्त होऊ दे, वारकऱ्यांची मनोकामना

गणेश सूळby गणेश सूळ
Tuesday, 2 July 2024, 15:38

केडगाव (पुणे) : महाराष्ट्रातील संतांनी जिथे वास्तव्य केले, जिथे जन्म झाला ती भूमी पवित्र झालेली आहे. त्यातीलच एक संतराज महाराज पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली आहे. यावेळी टाळ-मृदुंगाच्या साथीने संपूर्ण परीसरात “पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल”असे वातावरण निर्माण झाले होते.

श्रीक्षेत्र संगम येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी मंगळवार (ता.02) रोजी पावसाच्या सरीत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका हे पाहून भक्तांचे डोळे दिपून गेले. मुळा-मुठा व भीमा नदी यांच्या संगमावरील पुलावर पालखी सोहळा कोंडेवस्तीकडे येताना वारकरी पैलतीरावर बसून डोळ्यांमध्ये ते पालखी सोहळ्यातील दृश्य साठवत होते. या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 10 हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.

आज सकाळी सोहळ्यानिमित्त संगमेश्वराचा अभिषेक झाला. त्यानंतर पालखी, पादुका, मानाचा अश्व, संगमेश्वर यांचे पूजन करण्यात आले. पालखीरथाची आकर्षक अशी फुलाची सजावट मच्छिंद्र अडागळे यांनी केली आहे. पावसासाठी साकडे घालून वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यावर्षी भरपूर पाऊस पडू दे व शेतकरी दुष्काळमुक्त होऊ दे, असे साकडे वारकऱ्यांनी पांडुरंगास प्रस्थानावेळी घातले. सोहळा संगम येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करीत सोहळा न्याहरीसाठी कोंडेवस्तीवर विसावला. कोंडे परिवाराच्यावतीने 5 क्विंटल खिचडीवाटप करण्यात आली. सोहळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर देलवडीकडे मार्गस्थ झाला. देलवडी ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागतकमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले. हा सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी येथे स्थिरावला.

या कार्यक्रमासाठी शांतिनाथ महाराज, रमेश थोरात, रंजना कुल, सुरेश महाराज साठे, विकास शेलार, नामदेव ताकवणे, अप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सयाजी ताकवणे, माऊली ताकवणे, शिवाजी वाघोले, पोपटराव ताकवणे आदी मान्यवर व संतराज देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते.

 
गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Friday, 25 September 2026, 15:51

शिरूर तालुक्यात पुन्हा रक्तपात! तरुणावर कोयता आणि फायटरने जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Friday, 25 September 2026, 15:16
Next Post

भावकीच्या वादातून हत्या...! डोक्यात कोयत्याने वार करुन सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp