राहुलकुमार अवचट
Sanjay Raut | यवत : दौंड तालुका शेतकारी कृती समितीचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे.
ही सभा मौजे वरवंड ता. दौड येथील श्री नागनाथ विदयालय शाळेच्या मैदानावर सांय. ५ वा सभा होणार असून सभेला जाण्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे भिमा सहाकारी कारखान्याला भेट देणार आहेत. तसेच भिमा सहकारी कारखान्याचे संस्थापक मधुकाका शितोळे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करणार आहेत.
मात्र त्या ठिकाणी जाण्यास आमदार व भिमा पाटस सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल व कारखान्यातील कामगारांचा विरोध आहे. अशा परीस्थितीत सदर ठिकाणी कारखान्यातील कामगार व इतर विरोधक सभासद यांचेकडून काळे झेंडे, बॅनर, घोषणा अशा पध्दतीने विरोध होऊ शकतो.
तसेच खासदार संजय राऊत यांचे सोबत असणारे सभासद व कारखान्यात उपस्थित असणारे कामगार व इतर सभासद हे समोर येवून वाद विवाद होऊन भिमा पाटस कारखाना व कारखान्याचे परिसरामधील शांतता भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
यापार्श्वभूमीवर भिमा सहकारी कारखाना व परिसरात सकाळी ७.०० ते रात्री २३.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश दौंड – पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
या आदेशामध्ये २६ रोजी सकाळी ७.०० ते रात्री २३.०० पर्यंत भीमा पाटस कारखाना व परिसरात जमावबंदी राहील…
याबाबतीत कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक आदि माध्यमातून अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्तीची राहील.या परिसरात स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाच्या लेखी परवानगी शिवाय बॅनर फ्लेक्स होडींग लावण्यास प्रतिबंध राहील. सदर आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ या शिक्षेस पात्र राहील.