पुणे: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी अजय महाराज बरासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्याच्या काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी देखील धक्कादायक आरोप केले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आता सहकाऱ्यांच्या आरोपांना समोरे जावे लागत आहे.
बुधवार 21 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बरासकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले होती की, मनोज जरांगे यांना अध्यादेश, अधिनियम यामधील फरक माहीत नाही. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खालच्या भाषेत बोलतात. त्यांना अक्कल नसून ते लोकांची फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर असल्याने मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाशी चर्चा केली नाही. बैठकीत आधी ठरते वेगळे आणि माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात, असा आरोप अजय महाराज यांनी केला होता.
त्यानंतर आता मराठा आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत काम करणाऱ्या संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु, मला खरे समजल्यावर गेल्या दीड महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे पाटील कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचा फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवले आहे. ”
दरम्यान मनोज जरांगे यांनी अजय महाराज यांचे सर्व आरोप फेटाळले आहे. राज्य सरकारकडून आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अजय महाराज यांनी पैसे घेतल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारला हा ट्रॅप महागात पडणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले